साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक आयोजित ‘युवा छावणी २०२३’ दिनांक १ मे ते ७ मे दरम्यान वडघर येथील स्मारकात पार पडली. या छावणीला महाराष्ट्राच्या जवळपास २० जिल्ह्यातून शंभरहून अधिक युवा सहभागी झाले होते. स्वभान ते समाजभान, आर्थिक जडणघडण, निसर्गाविषयी जाणीव अशा विविध विषयांवर शिबिरार्थीसोबत संवाद आणि चर्चा पार पडल्या. युवा शिबिरार्थींच्या उत्साहाने ‘युवा छावणीची’ उर्जा आणि शोभा आणखी वाढली.