ने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर-गोरेगाव येथे गेली २० वर्ष आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय प्रेरणा प्रबोधन शिबीर मालिकेचे आयोजन केले जाते.स्मारकाच्या ३६ एकरच्या निसर्गरम्य परिसरातील उत्तम सोयी-सुविधा असलेल्या संकुलामध्ये सदर शिबीर घेतले जाते.
विषयांची मांडणी व्याख्यान/भाषण या स्वरुपात न करता विद्यार्थ्यांना आवडेल अशा कृतीशील उपक्रमांसह होते.विद्यार्थ्यांना स्वतःच्या भावभावना समजून घेवून राग, दुखः, आनंद व्यक्त करता यायला हवे. सर्वांशी जमवून घेत एकत्र राहता यायला हवे. स्वतःमधील सुप्त कलागुणाची समज यायला हवी.निसर्गातील व समाजातील समानता समजून घेता आली पाहिजे. हे सर्व या शिबिरामध्ये मनोरंजनात्मक कृतीशील उपक्रम तसेच संघटन कौशल्याच्या खेळांच्या माध्यमातून समजून देण्यात येतात.