यंदाच्या वर्षी देखील १० ते १४ मे दरम्यान आपल्या ‘साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात’ १० ते १४ या वयोगटातील मुला-मुलींसाठी ‘अभिव्यक्ती’ शिबीर पार पडले.
या शिबीरात महाराष्ट्रभरातून ३७ शिबिरार्थ्यांनी सहभाग घेतला. चाकावरील मातीकाम, झूमरिंग, अवकाश निरीक्षण, पपेट मेकिंग, स्टोरी स्पेलिंग, नेचर ट्रेकिंग, पक्षी निरीक्षण, विविध गाणी आणि खेळ शिबिरात घेण्यात आले. सर्व शिबिरार्थींनी पाच दिवस शिबिरात वेगवेगळे अनुभव घेतले.
त्यातील काही अविस्मरणीय क्षण…