“साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक”
तिसर्या सहस्रकाच्या तोंडावर, २००० मध्ये उभं राहिलेलं एक महत्त्वपूर्ण घटित – हॅपनिंग. ‘हॅपनिंग’ दोन्ही अर्थांनी. घटित, म्हणजे घडून गेलेलं म्हणूनही आणि सतत काहीतरी घडत असणारं म्हणूनही. इथे सतत काही होत असतं, काही घडत असतं; काही चर्चेत असतं, काही प्रत्यक्ष कृतीत असतं; कधी भूतकाळाचं मूल्यमापन असतं, कधी भविष्याचा वेध असतो. एकत्रितपणे या सार्यातून तरुणाईला एकविसाव्या शतकातल्या वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांमध्ये, समस्यांमध्ये हस्तक्षेप करण्याची शक्यता आणि संधी स्मारक देत आलं आहे. राष्ट्रीय स्मारकाची उभारणी झाली आहे तीच मुळी येणाऱ्या पिढ्यांच्या स्वप्नांना वाव देण्यासाठी.
– गजानन खातू